तुळशी धरणातून १११६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु
राधानगरी :
आज सोमवारी (दि. २६) सकाळी ६ वाजलेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत १६ मीमी. पावसाची नोंद झाली असुन धरणाची पाणी पातळीत सकाळपासुन०.२० मी. ने वाढली आहे. धरणातील पाणी साठ्यात ३६ दलघफूने वाढ झाली आहे.
आता धरणाची पातळी ६१६.१६ मी. असुन एकूण पाणीसाठा ३३३६ दलघफू आहे. धरण ९६% भरले आहे. एकुण पाऊस ३०१२मिमी. झाला आहे.
येणारा येवा १००० ते १२०० क्क्युसेक आहे. धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने आज सायंकाळी ४ वाजता तीन वक्राकार दरवाजातून १०१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.