कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होऊन लागल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प होताना दिसत आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना लसीचाच तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
सुरुवातीला लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा थंडा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देण्यात आला. हळूहळू जनजागृती होऊन लसीकरण साठी केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढू लागली खरी, मात्र आता लसीच्या तुटवडा जाणवू लागला आहे.
जिल्ह्यात १६ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी तात्काळ शासनाकडून लसीचा पुरवठा करण्यात यावा आणि आम्हाला लस उपलब्ध व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.