थेट : कोविड सेंटरमध्ये रुग्णांशी साधला संवाद : रुग्णांना दिला आधार
मनोबल वाढविण्यासाठी भेट
करवीर :
कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. रुग्णांना नातेवाइकांकडून आपुलकीची वागणूक मिळावी, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
राजेंद्र सूर्यवंशी यांनी थेट कोरोना सेंटरमध्ये रुग्णांशी संवाद साधला आणि रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्याची विचारपूस केली, याबद्दल रुग्ण व नातेवाईक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .
करवीर तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कुडित्रे सेंटरवर ११८ , कुरुकली सेंटरवर ६३, शिंगणापूर 57 ,के. आयटी ११० असे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. करवीर तालुक्यात अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहेत.अशावेळी कोरोना रुग्णांना नातेवाईक कडून आपुलकीची वागणूक मिळावी, अशी मागणी यावेळी सूर्यवंशी यांनी केली.
रुग्णांची नातेवाईक यांचेकडून हेळसांड होऊ नये यासाठी, सूर्यवंशी यांनी थेट कुडित्रे व सर्व सेंटरमध्ये भेट देऊन रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली. यावेळी काही गोरगरीब रुग्णांना औषध उपलब्ध होत नसल्यास स्वतः उपलब्ध करून दिली आहेत. रुग्णांबरोबर संवाद साधून विचारपूस केल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढले आहे . एक दिवसानंतर सर्व सेंटरला थेट रुग्णांशी, राजेंद्र सूर्यवंशी संवाद साधत असल्याने त्यांचे नातेवाइकांकडून कौतुक होत आहे .
कोविड सेंटर मध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्यामुळे गाव तेथे सेंटर होणे गरजेचे आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी व बेड उपलब्ध करून देण्यासाठी सूर्यवंशी यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात याबद्दल सूर्यवंशी यांची करवीर तालुक्यात प्रशंसा होत आहे.