करवीर
करवीर तालुक्यातील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी, मल्लेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेरसवाडीचे बबन भिकाजी कदम यांची, तर उपसरपंचपदी तेरसवाडीचे महादेव सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हनुमंत खाडे, ग्रामसेवक एस. जी. गुरव यांनी काम पाहिले.
यावेळी उद्योगपती रामचंद्र भोगम, सागर भोगम, बळवंत पाटील, तानाजी भोगम, रघुनाथ भोगम, राजाराम भोगम, सागर ढेरे, बाबूराव कदम, संदीप कदम, भिकाजी कदम, भगवान कदम, धोंडिराम कदम आदी उपस्थित होते.