करवीर :
साबळेवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उत्तम वासुदेव पाटील यांची निवड झाली. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती आंबी होत्या.
यावेळी उपसरपंच नामदेव पाटील, शाहू समूहाचे अध्यक्ष रणजित पाटील, बबन पाटील, कृष्णात पाटील , ग्रामसेवक अभिजीत चौगले ,व सदस्य उपस्थित होते.