‘गोकुळ’ दूध संघ खेळाडूंच्या नेहमीच पाठीशी : चेअरमन विश्वास पाटील (गोकुळतर्फे
मल्लांचा सत्कार )
कोल्हापूरः ता.२९.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये हनुमान तालीम कुस्ती संकुल राशिवडे बु. ता. राधानगरी च्या सात मल्लांची पुणे येथे होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचा संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांनी वेगवेगळे खेळ आत्मसात करून जिल्ह्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करावे .गोकुळ दुध संघ हा नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा असतो. हे मल्ल सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील मुले आहेत. त्यानी होणा-या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश मिळवावे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे व त्यांना होणा-या स्पर्धेसाठी शुभेच्छ दिल्या.
पै.ओंकार लाड, पै.सौरभ पाटील, पै.किशोर पाटील, पै.कुलदीप पाटील, पै.प्रतिक म्हेत्तर, पै.सरदार पाटील, पै.नितीन कांबळे, या मल्लांची निवड झाली आहे.
यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व संघाचे अधिकारी उपस्थित होते.