संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोविड योध्यांसाठी प्रशिक्षण
कोल्हापूर :
जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू इच्छि्णाऱ्या किंवा यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामधील विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणांतंर्गत त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 स्पेशल प्रोजेक्ट श्रेणी अंतर्गत राबविला जात आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून देण्यात येत असून उमेदवारांसाठी पूर्णपणे निशुल्क आहे. ओजेटीसाठीचा मेहनताना उमेदवारांना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer- DBT) च्या माध्यमातून दिला जाईल. या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षनार्थींचे मूल्यमापन केले जाईल व हा क्रॅश कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.
या योजनेंतर्गत हेल्थकेअर सेक्टर स्कील कौन्सिलच्या शिफारशीनुसार विशेष कार्यभूमिकांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कोविड फ्रंटलाईन वर्कर (होम केअर सपोर्ट घरगुती देखभालीसाठी मदत, कोविड फ्रंटलाईन वर्कर (बेसिक केअर सपोर्ट प्राथमिक सेवेसाठी मदत), कोविड फ्रंटलाईन वर्कर (अॅडव्हान्स केअर सपोर्ट प्रगत सेवेसाठी मदत ),कोविड फ्रंटलाईन वर्कर (इमर्जन्सी केअर सपोर्ट आपत्कालीन सेवेसाठी मदत), कोविड फ्रंटलाईन वर्कर (सॅम्पल कलेक्शन सपोर्ट -सॅम्पल गोळा करण्यासाठी मदत ), कोविड फ्रंटलाईन वर्कर (मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट ) वरील सहा कोर्सेससाठी संपूर्ण देशामध्ये प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून यापैकी पहिल्या ५ कोर्सेससाठी ५०० प्रशिक्षणार्थीना जिल्ह्यातील नोंदणीकृत रुग्णालयांमधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्य शासनाचे कौशल्य विकास, इंसिटम रोजगार व उद्योजकता विभाग आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालये तसेच व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणीकृत खासगी रुग्णालये यांच्या समन्वयाने प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात आली आहेत.
किमान दहावी, बारावी सर्व शाखा किंवा काही तांत्रिक कोर्सेस केवळ बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतरच करता येतात. उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना वैद्यकीय क्षेत्रात रोजगारची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून उमेदवारांना मेहनतानादेखील मिळणार आहे. प्रशिक्षण तुकड्या दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पूर्वी सुरु करण्याच्या सूचना असल्याने जास्तीत- जास्त इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पागा इमारत, भवानी मंडप, कोल्हापूर, दूरध्वनी क्र. ०२३१-२५४५६७७ किंवा नोंदणीकृत रुग्णालये संपर्क येथे साधावा किंवा गुगल https://forms.gle/XUS3bZMm3wHbzSAt9 द्वारे आपली इच्छुकता नोंदवावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.