शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

कोल्हापूर : 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्याकरिता एकूण 350.83 लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

या अभियानामध्ये विदेशी फळपिक लागवड (ड्रॅगन फ्रुट लागवड), पुष्पोत्पादन कार्यक्रम (कंदवर्गीय फुले व सुट्टी फुले लागवड), मसाला पिके (मिरची, हळद व आले लागवड), सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती (हरितगृह, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग) मधुमक्षिका पालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, पॉवर टिलर) पॅक हाऊस, शीतखोली, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्रक्रिया युनिट व फिरते विक्री केंद्र या घटकांचा समावेश आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांना संपर्क साधावा व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर (www.mahadbt.gov.in ) अर्ज करावेत, असेही श्री. पांगरे यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!