आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरवाडी येथे जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा : स्पर्धेचे ७ वे वर्षे
कोल्हापूर :
आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या ६ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त केएसए च्या मान्यतेने पिरवाडी – पुईखडी (ता.करवीर) येथे दि. ३ जानेवारीपासून जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या आश्विनी कृष्णा धोत्रे यांनी दिली.

या स्पर्धेचा प्रारंभ दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार असून स्पर्धा दि .३, ४ व ५ अशी तीन दिवशीय असणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ९२९२रुपये व ट्रॉफी , द्वितीय क्रमांकासाठी ६३६३ रुपये व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकासाठी ५०५० रुपये व ट्रॉफी याशिवाय वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. व्यवस्थापक म्हणून पिरवाडी स्पोर्ट्स असोसिएशन काम पाहणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, सभापती मंगल पाटील, उपसभापती अविनाश पाटील उपस्थित राहणार आहेत.
बक्षीस वितरण सभारंभ ५ तारखेला होणार असून आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी तसेच भोगावती कारखान्याचे संचालक उपस्थित राहणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. यावेळी करवीर तालुका संजय गांधी कमिटी अध्यक्ष संदीप पाटील, कृष्णा धोत्रे, सरदार पाटील, प्रभाकर पाटील उपस्थित होते.