पाडळी बुद्रुक येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून गावातील स्वच्छता :
360 कुटुंबांना पुराचा फटका
करवीर :
पाडळी बुद्रुक ता. करवीर येथे पुराचे पाणी ओसरल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने व लोकसहभागातून गावातील रस्त्यांवरील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली, सुमारे पाच ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ अनिता भिकाजी पाटील, उपसरपंच शिवाजी गायकवाड, सदस्य यशश्री पाटील, दीपक पाटील, हेमलता पाटील, यशश्री अश्वरत्न, ग्रामसेवक स्वाती चव्हाण, तलाठी सुरेखा नेचकर, उद्योगपती दिपक पाटील,दत्ता पाटील उपस्थित होते.
======================
यावेळी बोलताना सरपंच सौ अनिता भिकाजी पाटील म्हणाल्या सुमारे 360 घरातून पुराचे पाणी शिरले होते, सर्व कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते,सुमारे 15 घरांची पडझड झाली आहे . पडझडीचा सर्वे केल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.