शिक्षकांनी सायकल चोरट्याला काढले शोधून
करवीर :
करवीर तालुक्यातील श्रीराम हायस्कूल मधून गेल्या पंधरा दिवसात तीन विद्यार्थ्यांच्या सायकल्सची चोरी झाल्या. सायकल चोरी झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्यात चिंतेचे वातावरण होते. हा चोर आता सापडल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
गेल्या पंधरा दिवसात श्रीराम हायस्कूल कुडित्रे येथून तीन सायकली चोरी गेल्या, विद्यार्थी आणि पालकांच्यात याबाबत चिंता निर्माण झाली होती. शिक्षकही या प्रकाराकडे लक्ष देऊन होते, मात्र चोर सापडत नव्हता.आज पण त्या चोराने प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थ्याची पुन्हा सायकल चोरली .
दुपारीच आम्हाला एका भंगार डेपो वरून चोरीची सायकल मिळाली व तेथेच चोराचे नाव देखील समजले. शाळा सुटल्यानंतर शिक्षक एस एम नाळे बाहेर पडल्यानंतर त्यांना त्या चोराने गाडी थांबवण्यासाठी हात केला व दारू साठी शंभर रुपयाची मागणी केली. सरांनी त्याला गाडीवर बसून घेतले व थेट शाळेमध्ये आणले.
शाळेमध्ये त्याला खाक्या दाखवल्यानंतर त्याने सायकल कोठे विकल्या ते सांगायला सुरुवात केली. त्याला गाडीवर घालून प्रत्यक्ष सायकल विकलेल्या ठिकाणी नेले व त्या सायकल परत मिळवील्या.
एखाद्या पोलीस यंत्रणेप्रमाणे मोहीम पार पाडली. या मोहिमेमध्ये शिक्षक एस.एम. नाळे , डी एस राऊत , विकास परीट , शिवाजी पाटील कोपार्डेकर, एस डी कांबळे सहभागी झाले . या सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.