महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला संधी द्या – संभाजीराजे छत्रपती ( ‘ सप्तकिरणांसह पेनाची निब ‘ चिन्हाचे अनावरण )
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली.पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्यभरातून आलेल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली, यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मिळालेल्या ‘ सप्तकिरणांसह पेनाची नीब ‘ या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील संभाजीराजे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलत असताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्षांवर टीका करता या सर्व प्रमुख प्रस्थापित पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली असून या सर्व राजकीय पक्षांना बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले.
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव बोलताना म्हटले की, ‘स्वराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय पक्षांना याची धडकी भरलेली आहे त्यामुळे स्वराज्य पक्षाने लावलेले बॅनर प्रशासन व पोलीसांच्या मदतीने सरकार काढत आहे.’
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुढेकर, रघुनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पोवार, केशव गोसावी, महादेव तळेकर, महेश गवळी, ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे, रुपेश नाठे, विनोद परांडे, गणेश सोनवणे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.