सडोली दुमाला येथे ‘ एक तारीख एक तास श्रमदान’
करवीर :
करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत सडोली दुमाला व वि. मं. सडोली दुमाला यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘ एक तारीख एक तास श्रमदान ‘ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वि. मं. सडोली दुमाला शाळेच्या विध्यार्थ्यांची गावातून सवाद्य प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी मुलांनी हातात घेतलेले स्वच्छतेच्या घोषवाक्यांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
गावातील ग्रामपंचायत व देवालय परिसराची उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी स्वच्छता केली. उपक्रमात सरपंच अभिजित पाटील, संतोष भोसले, नितीन पोवार, युवराज पाटील, विनायक पारखे, प्रवीण देसाई, विनायक पाटील यांनी सक्रीय सहभाग घेतला.यावेळी ग्रामस्वच्छता विषयक नवनवीन योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
अध्यापक एम आर कांबळे यांनी “स्वच्छता जीवनातील आवश्यक अंग” या विषयावर व्याख्यान दिले. उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
शाळा स्तरावर निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापिका सुरेखा नलवडे, महादेव खोंद्रे,चंद्रकांत थोरवत, अश्विनी पोवार, योगिता निकम, प्रज्ञा गडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
स्वागत मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी तर आभार पदवीधर अध्यापक एकनाथ कुंभार यांनी मानले.