शिरोली दुमाला येथे ‘ स्वच्छता ही सेवा ‘ उपक्रमातंर्गत एक तास स्वच्छतेसाठी
करवीर :
स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) ‘ स्वच्छता ही सेवा ‘ या अभियानाअंतर्गत कचरा मुक्त भारत या संकल्पनेतून रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी
श्री हनुमान विकास संस्था व हनुमान दूध संस्था यांच्या वतीने एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. कुंभी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक किशोर आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी किशोर पाटील म्हणाले, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छता ही महत्वाची आहे. यासाठी शासनाने स्वच्छता ही सेवा हा सुरू केलेला उपक्रम गरजेचा असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरचा व गावचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले.
उपक्रमात एकनाथ शंकर पाटील, श्रीकांत रघुनाथ पाटील, धोंडीराम भिवा पाटील, बाळासो शंकर पाटील, बळवंत आनंदराव देसाई, आनंदा पांडुरंग पाटील, भिकाजी गणपती देसाई, दिनकर चंद्रप्पा जाधव, बाबुराव पांडुरंग पाटील, कृष्णात आनंद पाटील आदी सहभागी झाले होते.