सामाजिक, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कचरा उठावं
कोल्हापूर :
१५ ऑगस्ट निमित्य सर्वत्र कार्यक्रम होताना दिसतात मात्र स्वच्छतेचा उपक्रम झालेला पहावयास मिळत नाही. मात्र एका सामाजिक कार्यकर्त्यांने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कचरा उठाव केला त्यांच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांच्यातून कौतुक होत आहे.
अचानक ते सामाजिक कार्यकर्ते आले आणि जेसीबी व ट्रॅक्टर यंत्रणा बोलवून कचरा एकत्र करणे सुरुवात केली ,यातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिंगणापूर खांडसरी येथील कचरा उठावं केला. कॅप्टन उत्तम पाटील यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविला, यावेळी १५ ट्रॉली कचरा काढला आणि तो कचरा गावापासून लांब खनित टाकण्यात आला, यामुळे पुन्हा एकदा या परिसरातील दुर्गंधी नष्ट झाली . गेल्या महिन्यात या परिसरातील सुमारे ३० ट्रॉल्या कचरा त्यांनी स्वखर्चाने उठाव केला होता, यानंतर एका महिन्यात पुन्हा पंधरा ट्रॉली कचरा या ठिकाणी पडला होता.
ग्रामपंचायत अथवा कोणालाही न सांगता त्यांनी आज या कामाची सुरुवात केली. याबाबत त्यांनी मीडियाशी काही संपर्क साधला नाही, हे काम प्रसिद्धीसाठी केलेले नाही असे त्यांनी सांगितले . असा मुख्य ठिकाणाचा कचरा उठाव झाला तर परिसर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांच्यातून व्यक्त होत होत्या.
शहराशेजारी हा परिसर असल्यामुळे लोकवस्ती वाढत आहे ,त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनणार आहे, यामुळे महानगरपालिकेने कचरा कुंड्या ठेवाव्या अशी मागणी होत आहे.
यावेळी कॅप्टन उत्तम पाटील,अमर पाटील, दीपक माने, संजय चौगले, अजित चौगले, मंगेश पाटील, सर्जराव मस्कर, विष्णू पाटील, रणजित पाटील, उपस्थित होते.