साधा संधी : कौशल्य स्पर्धेकरिता नोंदणी करण्याचे आवाहन
कोल्हापूर :
सन 2021-22 मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 47 विविध अभ्यास क्षेत्राशी संबंधित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल काऊन्सील, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 17 व 18 ऑगस्ट या कालावधीत संबंधित जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील अभ्यासक्रमांची यादी पाहण्यासाठी तसेच कौशल्य स्पर्धा सहभाग नोंदणीसाठी लिंक उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी स्पर्धेतील सहभागासाठी नोंदणी करण्याकरिता सोबत देण्यात आलेल्या लिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform किंवा https://www.facebook.com/MaharashtraSDEED/photos/a.109120754551821/225261322937#Ã763/ या लिंकवर क्लिक करून आपली परिपूर्ण माहिती भरावी. तसेच अधिक माहितीसाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ , https://worldskillsindia.co.in/worldskill/world/ https://worldskillsindia.co.in/kazan2019.php या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या स्पर्धेकरिता इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष राहूल रेखावार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.