कोगे येथे सारंग सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व वृक्षारोपण
करवीर :
कोगे ता. करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते,सारंग इंटरप्राईजेस चे प्रोप्रायटर सारंग अशोक सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

संघवी मिनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल, मंथन फाउंडेशन आणि रौनक पोपटलालजी शहा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटना कोगे यांच्या सहकार्यातून हे शिबिर झाले. यावेळी सुमारे 300 रुग्णांची तपासणी झाली. यामध्ये जनरल तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी , डोळे तपासणी, इसीजी काढणेत आली.
डॉक्टर रवींद्र वाळवे व त्यांच्या टीमने सहकार्य केले.गणेश मंदिर येथे वृक्ष लागवडही करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष सातपुते, सखाराम शिवा दूध संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव पाटील ,माजी उपसरपंच तानाजी मोरे , एम.आर.गायकवाड पोलिस उप निरीक्षक , ग्रा.प. माजी सदस्य शिवाजी सातपुते,ग्रा.प.सदस्य करण पाटील,,ग्रा. प.सदस्य रमेश सातपुते, अशोक सातपुते ,कृष्णात सातपुते , राहुल पाटील ,राजाराम पतसंस्थेचे अध्यक्ष बळी चव्हाण, शिवाजी पाटील, यशवंत बँक संचालक उत्तम पाटील ,सुरेश सातपुते ,किरण सातपुते, करण सातपुते, मधुकर सातपुते ,सचिन सातपुते, पंत सातपुते ,बाजीराव सातपुते, विशाल सातपुते ,पैलवान किरण मोरे,अक्षय इंगळे,
सागर सातपुते,किरण पाटिल,सतिश पाटिल,सुनिल सातपुते ,बाजीराव सावंत, सुनिल सावंत,प्रविण सातपुते, रजत सातपुते उपस्थित होते.