सांगरुळ गणेशोत्सवात ऐतिहासिक देखाव्यांची पर्वणी
कोल्हापूर :
येथे गणेश उत्सवाला मोठी परंपरा आहे. सर्व तरुण मंडळाच्या वतीने सामाजिक पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. रविवारी सजीव देखावा व सोमवार मंगळवारी गणेशाचे विसर्जन होणार आहे.यावेळी समाज प्रबोधन पर कार्यक्रम पाहण्याची पर्वणी आहे.मराठा -मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात.

राधाकृष्ण तरुण मंडळांने वीर संताजी घोरपडे, शाहू तालीम मंडळ ऐतिहासिक प्रतापराव गुजर, अजिंक्य तरुण मंडळाने हिरकणी, आणि बहुतांश तरुण मंडळांनी ऐतिहासिक देखाव्यांचे नियोजन केले आहे. गोल्डन जुबली या मंडळाची पन्नास वर्षाची परंपरा आहे, त्यांनी अंधश्रद्धा, साई गणेश मंडळाने नरबळी ,यंग स्टार मंडळाने व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम लोकांसमोर सादर करण्याचे नियोजन केले आहे. मराठा मुस्लिम सर्व अठरापगड जातीचे लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव तरुण मंडळाचे ठिकाणी साजरा करतात.
ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश विसर्जन व निर्माल्य दान उपक्रम सुरू केला होता, हा उपक्रम सातत्याने सुरू आहे.
तरुण मंडळामध्ये न्यू यंगस्टार ,गणेश मंडळ, शिवप्रेमी तरुण मंडळ, साई गणेश तरुण मंडळ, राधे राधे तरुण मंडळ, शाहू तालीम मंडळ, बिरोबा तरुण मंडळ, बलभीम तालीम मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, न्यू क्रांती तरुण मंडळ ,गोल्डन ज्युबिली तरुण मंडळ, दत्त गणेश तरुण मंडळ, वन चॅलेंज तरुण मंडळ, आण्णा भाऊ साठे तरुण मंडळ ,धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ ,अजिंक्य क्रीडा मंडळ, १६३० द ग्रुप ऑफ मराठाज, आसरा गणेश तरुण मंडळ, न्यू सुपर गणेश तरुण मंडळ, राधाकृष्ण कला क्रीडा मंडळ ,स्पार्टन बॉईज गणेशोत्सव मंडळ , जिंकू रणांगणावरच तरुण मंडळ, कै.मा.धो. खाडे कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ ( सम्राट ) स्वराज्य गणेश तरुण मंडळ
यांचा समावेश आहे.