प्रेरणादायी : फळविक्रेता ते सनदी अधिकारी झेप
Tim Global :
स्वप्निल तुकाराम माने याने फळविक्रेता ते सनदी अधिकारी अशी झेप घेतली तर आशिष अशोक पाटील या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने नेत्रदीपक यश मिळविले.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अभियंत्यांनी केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे.
केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये साळशी (ता. शाहुवाडी) येथील आशिष अशोक पाटील यांनी ५६३ तर सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील स्वप्निल तुकाराम माने याने ५७८ बी रँक मिळविली.
स्वप्निल माने याचा कष्टातून झालेला प्रवास प्रेरणादायी असून तो चौथीत शिकत असताना २००६ साली आई वैशाली तर त्यानंतर दोन वर्षांनी फरशी विक्रीचा व्यवसाय छोटा व्यवसाय करणारे वडील तुकाराम माने यांचे निधन झाले. आजी-आजोबांनी त्याचे संगोपन केले. लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धेत चमकणाऱ्या स्वप्नीलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली. त्याने फळविक्रेता म्हणूनही काम केले. गारगोटी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. तेव्हापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले होते.
आशिष चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तो राज्यात तिसरा आला होता. दहावीला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत त्यांनी यश मिळवले होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायचे असल्याने येथे प्रवेश घेतला. पुण्यातच त्याने ईएनटीसी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. येथूनच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या परीक्षेत त्यांने प्राथमिक फेरी पार केली होती. दुसरी फेरी गाठू शकला नाही.
त्याच वेळी त्याने जिद्दीने पुढच्या वर्षी यश मिळवायचे असे ठरवले होते. मागील चुका टाळत त्याने जिद्दीने यावेळीची परीक्षा देऊन यश मिळवले आहे.