शिवार फेरीमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

कोल्हापूर :

मनरेगा अंतर्गत सन 2022-23 चा कृती आराखडा तयार करण्यासाठी येत्या 15 दिवसांत गाव निहाय शिवारफेरी करण्यासाठीचे वेळापत्रक तयार करा. कृती आराखडे परिपूर्ण व वास्तवदर्शी होण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी शिवार फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करुन या शिवार फेरीला सरपंच व सदस्य,  ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, तलाठी,  कृषी सहाय्यक, वन व सामाजिक वनीकरण विभागाचे तांत्रिक अधिकारी, अंगणवाडी सेविका व इतर ग्रामस्तरीय अधिकारी  तसेच ग्रामस्थ उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

     जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना विभागांतर्गत विविध विषयांसदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी  श्री. चंदनशिवे तसेच वन विभागाचे सहायक वन संरक्षक सुनील निकम, नरेगा बीडीओ स्वप्नील मगदूम,  जिल्हा जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते तर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन क्षेत्रपाल (वन विभाग व सामा. वनिकरण) हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2022 – 23 साठीचे लेबर बजेट बनवण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु नसलेल्या 158 गावांत तात्काळ कामे सुरु करावीत. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग , रेशीम लागवड  विभाग व इतर यंत्रणांनी आपल्या विभागाची कामे वेळेत सुरु होण्यासाठी नियोजन करावे. 
ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरोजगार सेवक पद रिक्त असल्यास तात्काळ भरण्यासाठी कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

ग्रामस्तरीय आराखडे येत्या ग्रामसभेमध्ये मंजूर होण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. प्रत्येक विभागाने त्यांचे मनुष्यदिवसांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना  जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केल्या.

     उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध विषयांचा तसेच झालेल्या कामांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेतला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!