स्पर्धा परीक्षा : राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी १०० पदे वाढली
पुणे :
एमपीएससी ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१’
साठी १०० पदे वाढली आहेत.यामुळे ३९० पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जाहिरातीमध्ये नमूद १७ संवर्गातील २९० पदांव्यतिरिक्त तीन संवर्गांतील शंभर पदांच्या वाढीमुळे ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१’मध्ये २० संवर्गांतील ३९० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
४ ऑक्टोबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात २९० पदांसाठी परीक्षा होणार असल्याचे, २ जानेवारी २०२२ रोजी पूर्व परीक्षा आणि ७ ते ९ मे २०२२ दरम्यान मुख्य परीक्षा होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
राज्य सेवेतून भरल्या जाणाऱ्या संवर्गातील पदांसह नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
जाहिरातीमधील अटी, शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.