डॉ.एन.डी.पाटील यांना अनोखी श्रद्धांजली : शेतमजूर कष्टकरी ऊसतोड मजुरांना भाजी भाकरी पॅकेट्सचे वाटप : ‘ सुशील पाटील कौलवकर युवा मंच’ चा उपक्रम
राधानगरी :
उपेक्षित समाजासाठी आपले जीवन खर्च केलेल्या डॉ.प्रा. एन डी पाटील व सिंधुताई संकपाळ यांना श्रद्धांजली म्हणून सुशील पाटील कौलवकर युवा मंचच्या वतीने कौलव जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावांतील शेतमजूर व ऊस तोडणी मजुरांना
युवा नेते सुशील पाटील कौलवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजी भाकरी वाटप करण्यात आली.
यावेळी तुकाराम धामणे (तरसंबळे) ,शिवाजी चौगले, (तरसंबळे), अशोक बुगडे सर (घुडेवाडी),अनिल पाटील (तारळे खुर्द) , जयसिंग पाटील, सुरेश नेवगे, पंकज पाटील, दिगंबर येरूडकर, सचिन पाटील, रजत नेवगे,आर जी चरापले, मंदार किरुळकर, वैभव पाटील आदी मंच चे कार्यकर्ते उपस्थित होते.