गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्‍था ऑनलाईन संभा : पतसंस्‍थेच्‍या सभासदांना १२ टक्‍के डिव्हिडंड जाहीर

कोल्‍हापूरः

‘गोकुळ सलग्‍न’ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पत संस्‍था मर्या.,कोल्‍हापूर या संस्‍थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने घालून दिलेल्‍या नियमानूसार ऑनलाईन पध्‍दतीने दिनांक २६/०९/२०२१ इ.रोजी संस्‍थेच्‍या कार्यालयात चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली.

      चेअरमन आसुर्लेकर यांनी संस्‍थेच्‍या अहवाल सालातील प्रगतीचा आढावा सभेपूढे वाचन केला. सध्‍या संस्‍थेचे वसुल भाग भाडवंल २१.४७ कोटी, ठेवी ३२.१०कोटी, कर्जे  ६७.५३कोटी, चालू नफा  १६.०३ लाख, खेळते भाडवंल  ६९.८० कोटी असून वार्षिक उलाढाल १३१ कोटी इतकी झाली आहे. संस्‍थेने सन २०१९-२०२० सालातील शेअर्स रक्‍कमेवर १२ टक्‍के डिव्‍हीडंड देणेचे जाहीर केले व विषय पत्रीकेवरील सर्व विषयांना खेळीमेळीत चर्चो विनिमय होऊन मंजुरी देणेत आली. सदर ऑनलाईन सभेस सभासदांनी मोठ्या संख्‍येने भाग घेतला. यावेळी आभार संस्‍थेचे सहा.व्‍यवस्‍थापक संभाजी माळकर यांनी मानले.

      याप्रसंगी संस्‍थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, व्‍हा.चेअरमन सतिश मदने, संचालक नंदकुमार गुरव, शिवाजी पाटील, परशुराम पाटील, सुनिल घाटगे, राजेंद्र पाटील, संभाजी देसाई, गणपती कागणकर, संचालिका शुभदा पाटील, छाया बेलेकर, संस्‍थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!