युवकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासावी : राजेंद्र सूर्यवंशी
करवीर :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत आमशी (ता.करवीर) येथील पै. सरदार सावंत यांनी आपला वाढदिवसणानिमित्त गावांमध्ये एक हजार मास्कचे मोफत वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
आमशी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा वेळी सर्वांनीच योग्य जबाबदारी ओळखून वाढदिवसानिमित्त नको तो बडेजाव न करता कोरोनाला आळा घालण्यासाठी लोकांना उपयुक्त ठरतील असे मास्क वाटप करण्याचा उपक्रम सरदार सावंत यांनी घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गावातील दूध संस्था, विविध सेवा संस्था, दुकानदार व ग्रामस्थ यांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी कोरोना काळात सरदार सावंत यांनी मास्क वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. युवकांनी वाढदिवसानिमित्त विविध प्रकारे अशी बांधीलकी जोपासण्याची गरज आहे, असे सांगून सावंत यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सरपंच उज्वला पाटील, उपसरपंच नामदेव पाटील, भगवान गुरव, रामनाथ पाटील, तानाजी पाटील, कृष्णात पाटील , जयदीप पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शिवाजी वाडकर आदी उपस्थित होते.