गोकुळ निवडणूक : संघाचे माजी संचालक दिनकर कांबळे गटाचा विरोधी शेतकरी आघाडीला पाठिंबा
कोल्हापूर :
गोकुळ दुध संघाचे माजी संचालक दिनकर कांबळे यांनी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे भुदरगड तालुक्यात सत्तारुढ आघाडीला धक्का बसला आहे.

गोकुळ निवडणूक संदर्भात अजिंक्यतारा येथे गोकुळ दूध संघाचे माजी संचालक दिनकरराव कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, विश्वासराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठिंबा दिला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, दूध उत्पादक सभासदांच्या हितासाठी आम्ही लढत आहोत .त्यामुळे जिल्ह्यातील ठराव धारकांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
दिनकर कांबळे म्हणाले, ना. मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांचा संघर्ष हा गोकुळ वाचावे यासाठी आहे. त्यामुळे शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, खानापूर माजी सरपंच भुजंगराव मगदूम, प्रा.शाम पाटील, संदीप कांबळे, बाळासाहेब गुरव ,चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.