अशी ही : सामाजिक बांधिलकी
विद्युत पुरवठा नसताना स्वतःडिझेल टाकले जाते
कोल्हापूर :
Free water from social commitment….पुरकाळात
वाकरे ता . करवीर येथील दिनकर दत्तू सुर्यवंशी परिवाराकडुन वाकरे सह पंचक्रोशीतील गावांना, नागरीकांना विहीरीचे पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध केले आहे ,या सामाजिक उपक्रमाबद्दल सूर्यवंशी कुटुंबाचे परिसरातून कौतुक होत आहे .
भोगावती नदीला महापुर आलेल्या काळात सलग आठवठाभर भागातील विद्युत पुरवठा बंद असले मुळे वाकरे,व पंचक्रोशीतील गावांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती. दरवर्षी पाणी उपसा बंद राहत आहे. अशा अडचणीत वाकरे गावातील सुर्यवंशी परिवारामुळे त्यांच्या विहीरी मुळे पाच गावच्या पिण्याच्या पाण्याची मोफत सोय झाली आहे.
विद्युत पुरवठा नसताना मोठ्या जुन्या इंजिनवरती स्वतःडिझेल टाकुन पाणी उपलब्ध करुन दिले जाते. पाणी वाहणारे टॅकर व वाहनासाठी ये – जा करणे साठी व्यवस्थित सोय केली जाते,पाणी टॅकर ,टाकी मध्ये भरणेसाठी पाईप व व्हाॅल्वची सोयसुध्दा करून ठेवलेली होती,Such is the social commitment.
वाकरे गावातील ग्रामस्थांना सलग तीन वर्षांत महापुरामुळे पाण्याची अडचण निर्माण झाली आहे, अशा वेळी सुर्यवंशी परिवाराने पाण्याची अडचण दूर केली आहे, या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.