‘ सावित्रीच्या लेकी ‘ सामाजिक संस्थेमार्फत आशा स्वयंसेविकांना मेडिकल कीटचे वाटप
कोल्हापूर :
सडोली खालसा (ता. करवीर) येथील ‘ सावित्रीच्या लेकी ‘ सामाजिक संस्थेच्या वतीने हसूर दुमाला येथील प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील विविध गावात कोरोना जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना मेडिकल किट चे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवाळे गावच्या सरपंच शालिनी पाटील होत्या .
संस्थेच्या अध्यक्षा शैला कुरणे यांनी संस्थेमार्फत महिला सक्षमिकरणासाठी जे विविध उपक्रम राबविले जातात त्याची माहिती दिली .कोरोना सारख्या महामारीच्या काळात सामाजिक बांधीलकी म्हणून कार्यरत असणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी व्हिटॅमिन गोळ्या , सॅनिटायझर , थर्मल मशीन , गन या सारख्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व गोष्टींचे किट प्रत्येक गावातील आशा कर्मचारयांना वाटप करण्यात आले . यामध्ये३८ आशा स्वयंसेविका, ०२ पर्यवेक्षिका यांना साहित्य वाटप करण्यात आले . शैला कुरणे ह्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी देशपरदेशातील फौंडेशनच्या माध्यमातून ही मदत उपलब्ध केली आहे .
त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . या मेळाव्या दरम्यान महिलांच्या वैयक्तीक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच आशा स्वयंसेविकांना येणाऱ्या विविध समस्या व उपाययोजना या विषयी उद्बोधन केले . अनेक आशा नी आपली मनोगते व्यक्त केली . रा. बा . पाटील विद्यालयाचे शिक्षक , रावसाहेब शिंदे यांनी ‘राष्ट्र उभारणीच्या कार्यात महिलांचे योगदान ‘ या विषयावर व्याख्यान दिले .
या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी कांबळे , आनंदा मोरे , जयश्री पाटील , सिंधू पाटील , साधना कांबळे ( हळदी ) उपस्थित होते .