वाह..भारीच ! या गावात झाले 100 % लसीकरण
कोल्हापूर :
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशावेळी शिंदेवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायतीला योग्य व्यवस्थापन करून गावात शंभर टक्के लसीकरण करण्यात यश आले आहे. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. 100 टक्के लसीकरण होणारी परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे .
सरपंच रंजना आंबाजी पाटील, उपसरपंच संदीप शिंदे व सदस्य सागर पाटील, रेखा सुतार, जयश्री शिंदे, रंजना पाटील, मेघा पाटील, ग्रामसेवक एस एस पाटील, आरोग्यसेविका डी. एस. कासार, व्हि.एस. सरनाईक, सुपरवायझर राधा पाटील,आशा सेविका पूजा शिंदे ,अंगणवाडीसेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी लसीकरणाबाबत जागृत राहून काम केले आहे. काही ग्रामस्थांचे खुपिरे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी लसीकरण करण्यात आले . यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन करून सुरुवातीला दूध संस्था कर्मचारी,धान्य दुकानदार, फ्रन्टलाइन वर्कर यांना लसीकरण देऊन, गावात लसीकरणाचे आत्तापर्यंत दोन कॅम्प घेण्यात आले आहेत .
यामध्ये 45 व या वरील सर्व सुमारे साडेचारशे नागरिकांना लसीकरण करण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे . यामध्ये बाहेर गावी गेलेले नागरिक व इतर किरकोळ आजाराचे नागरिक असे अपवाद वगळता लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे . पहिला कॅम्प, साठ वर्षे वयावरील नागरिकांसाठी घेतला, यानंतर 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा कॅम्प घेऊन लस देण्यात आली आहे. परिसरातील 100 % लसीकरण झालेले हे पहिले गाव आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
रंजना पाटील सरपंच ,
गावांमध्ये 100 % लसीकरण केले आहे , गावात औषध फवारणी केली आहे , आरोग्य यंत्रणा, पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे.