कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करण्याचे संकेत असून जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे .

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे १६ मे पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे.
यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवसाय, सर्व उद्योग बंद असून दूध औषधे भाजीपाला वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. जिल्ह्यात नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . आता आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढण्याची चर्चा होती.
दरम्यान, लॉकडाऊन रविवार रात्री बारापासून शिथिल करून ३१ मे पर्यंत राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी
७ ते ११ व्यवहार सुरू राहतील, असेच संकेत मिळत आहेत.