पालकमंत्र्यांचा शिळ्या कढीला ऊत, त्यांनी आता कन्सेप्ट बदलावी : शौमिका महाडिक यांची टीका
कोल्हापूर :
व्यक्तिद्वेषातून गोकुळवर आरोप सुरू आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. प्रत्येकवेळी महाडीकांवर आरोप करून आता निवडणूक जिंकता येणार नाही.
त्यांनी आता कन्सेप्ट बदलावी , अशी टीका राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवार , जि. प. च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केली.

गोकुळ निवडणुकीसाठी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या प्राचारार्थ दऱ्याचे वडगाव येथे ठरावधारकांच्या झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तरादाखल शौमिका महाडिक यांनीही टोले हाणले आहेत.
यावेळी शौमिका महाडिक यांनी पुढे, पालकमंत्री सतेज पाटील हे निवडणूक आली की महाडिकांवर आरोप करत असतात. महाडिकांवर त्यांनी इतका अभ्यास केला की त्यांना एखादी डॉक्टरेट मिळू शकेल असा टोला लगावला.
पालकमंत्र्यांचे आरोप चुकीचे असल्याचे सांगत महाडिक उद्योग समूह अनेक वर्षे कार्यरत असून त्याच्या उलाढालीच्या तीन टक्केही उलाढाल गोकुळची नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. याउलट तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये किती मुलांना मोफत शिक्षण दिलं? असा सवाल करत गोपाळ दूध संघावर बोलणाऱ्या नेत्यांनी महालक्ष्मी दूध संघावरही बोलावे असे आव्हानदेखील शौमिका महाडिक दिले.
या मेळाव्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी, ठरावधारक, सभासद उपस्थित होते.