करवीर तालुक्यात १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर क्षयरोग कुष्ठरोग शोध मोहीम
कोल्हापूर :
करवीर पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. अशी माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

१३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत कालावधी असून या कालावधीमध्ये दोन आठवड्या पेक्षा पेक्षा जास्त दिवस खोकला असेल , वजनात लक्षणीयरीत्या घट होणे, भूक मंदावणे, खोकल्यातून रक्त पडणे,ही क्षय रोगाची लक्षणे तसेच संशयित कुष्ठरोग लक्षणे असलेले त्वचेवर फिकट लालसर चट्टा असणे, जाडबधिर तेलकट चकाकणारी त्वचा ,त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जड होणे, वरील लक्षणे असणारे रुग्णांची थुंकी तपासणी व एक्स-रे मोफत करून निदान करण्यात येणार आहे .
तपासणीकरिता तालुक्यात ४२० कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली असून एक लाख एकवीस हजार एकशे पाच घरातील पाच लाख २६ हजार ३६३ लोकसंख्येची तपासणी करणेत येणार आहे ,तसेच औषध उपचाराने क्षयरोग कुष्ठरोग पूर्णपणे बरा होत असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी जयवंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी फारुख देसाई यांनी केले आहे.
या मोहिमेमध्ये घरातील सर्व व्यक्तींची तपासणी होणार असून अशा स्वयंसेविका ,पुरुष स्वयंसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका सहभागी होणार आहेत तसेच आरोग्य सहाय्यक ,गटप्रवर्तक, समुदाय आरोग्य अधिकारी पर्यवेक्षक करणार आहेत, या मोहिमेचे सनियंत्रण प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरून वैद्यकीय अधिकारी तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी करणार आहेत.