शासकीय कोट्यातील प्रवेश : डी. एल. एड्. प्रथमवर्षासाठी प्रवेश सुरू
कोल्हापूर :
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठी प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 22 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय.सी. शेख यांनी कळविले आहे.
डी. एल. एड. ऑनलाईन प्रवेशाबाबत सविस्तर सुचना व ऑनलाइन प्रवेश अर्ज महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावा. अधिकाऱ्यांनी अर्जाची ऑनलाईन पडताळणी केल्याशिवाय विद्यार्थांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थांला वेळोवेळी एसएमएस द्वारे कळविले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, 0231-2581831 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. शेख यांनी केले आहे.