सिकंदर शेखचा भोला ठाकूरवर विजय

सांगरूळ मैदान

कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी

करवीर :

छत्रपती शाहू नाळे तालीमीच्या वतीने झालेल्या निकाली कुस्ती मैदानात महान भारत केसरी सिकंदर शेख गंगावेस यांनी महान भारत केसरी भोला ठाकूर पंजाब याच्यावर
एकलंगी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवत शाहू केसरी किताबासह चांदीची गदा पटकावली .खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे हस्ते व संजय मंडलिक ,धैर्यशील माने ,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके,गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील ,सुशांत नाळे यांच्या उपस्थितीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस देण्यात आले .

प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत
सलामी झडताच दुसऱ्याच मिनिटाला आक्रमक होत सिकंदर बगल डूब डाव टाकत भोलाचा ताबा घेतला .सिकंदर एकचाक डावाची पकड करत असताना भोलाने त्यातून सुटका करून घेतली .पुढच्याच मिनिटाला सिकंदरने दस्ती खेचत भोलाचा ताबा घेतला .आणि कुस्तीच्या नव्या मिनिटाला सॉरी भरत एकलंगी डावाची पकड करत भोलाला चित्रपट करून त्याच्या छातीवर बसला .

प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीत महान भारत केसरी माऊली जमदाडे यांने मुंबई महापौर केसरी भारत मदने यांच्यावर गुणावर विजय मिळवत आदियोगी वाॅरिअर्स केसरी किताबाचा मानकरी ठरला . द्वितीय क्रमांकाच्या लढतीत सेनादलच्या संग्राम पाटील आमशी याने अरुण बोगार्डे मोतीबाग याचेवर विजय मिळवत छत्रपती केसरी किताब पटकाविला .

       पै माऊली जमदाडे व पै . भारत मदने यांच्यात झालेल्या प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीत  माऊलीने सलामीलाच  आक्रमक होत एकेरी पट काढत भारतवर ताबा मिळवला .  एकेरी  पट काढत भारतने माऊलीवर ताबा मिळविला .पण माऊलीने यातून सुटका करून घेत भारतचा ताबा घेतला . बराच वेळ झाला तरी कुस्ती निकाली न झाल्याने कुस्ती गुणावर घेण्याचा  संयोजकांनी निर्णय घेतला . यात माऊलीने एकेरी पट काढत भारतवर ताबा  मिळवत पहिला गुण घेतला पंचांनी माऊलीला विजयी घोषित केले .

पै.धैर्यशील लोंढे, पै.केदार खाडे , पै.साई सुतार ,शुभम खाडे, अनुज घुंगुरकर ,हर्षद कापडे ( सांगरुळ ) या स्थानिक मल्ला बरोबरच , प्रशांत जगताप (इचलकरंजी ),पै . सनिकेत राऊत ( कुंभी कारखाना ), प्रज्वल कांबळे ( न्यू मोतीबाग ) ,पार्थ कळंत्रे ( बाचणी ), संकेत पाटील (आमशी ), रोहित पाटील (साबळेवाडी ), यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणिय विजय मिळविलेत .
हिंदकेसरी पै दिनानाथ सिंह यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन या कुस्ती मैदानात सन्मानित करण्यात आले .

केडीसीसीचे संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, एस आर पाटील, कुंभीचे उपाध्यक्ष विश्वास, सर्व संचालक, निवास वातकर, मारुती जाधव, संभाजी पाटील, कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!