करवीर :
कुडित्रे ता. करवीर येथील महिमा अमोल खेडकर या पहिलीच्या विद्यार्थी ने ओपन रियल स्केटिंग चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. या विद्यार्थिनीचे परिसरात कौतुक होत आहे.

आनंदी इंग्लिश मीडियम स्कूल येथे महिमा खेडकर ही विद्यार्थिनी शिकत आहे. स्केटिंग सचिन टीम टॉपर यांच्याकडे ती सध्या स्केटिंग साठी सराव करते.
सांगली-मिरज-कुपवाड रियल स्केटिंग असोसिएशन आणि साई स्केटिंग अकॅडमी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ओपन रियल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महिमा ने गोल्ड मेडल मिळविले.
यापूर्वी सतत एक तास स्केटिंग करणे , आम्ही कोल्हापुरी धाडशी स्पर्धा, 26 जानेवारी निमित्त सचिन टीम टॉपर या स्पर्धेत महिमा ने गोल्ड मेडल मिळवले आहे. महिमाला शिक्षक सचिन इंगवले , स्वाती बेलेवळेकर, आई माधुरी खेडकर, वडील अमोल खेडकर यांचे मार्गदर्शन मिळाले.