महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक मंजूर

मुंबई :

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक नुकतेच मंजूर केले होते. आता शक्ती विधेयकाला बळकटी आणण्यासाठी आणखी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सन २०२० चे विधेयक क्र. ५२ “महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, २०२०” मांडले. सभागृहाने या विधेयकाला एकमताने मंजुरी दिली. या विधेयकातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल, तसेच महिला अत्याचार प्रकरणातील अपराधाचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास विशेष पथकाकडे देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले “राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतून राज्य सरकारने विधेयक क्र. ५१ – शक्ती विधेयक याधीच मंजूर केले होते. परंतु त्या विधेयकला आवश्यक असणाऱ्या इतर सुविधा देण्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करायला हवी होती. त्या व्यवस्थेसाठी २०२० चे विधेयक क्र. ५२ “महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, २०२०” हे विधेयक आणण्यात आले आहे.

याआधी १४ डिसेंबर २०२० रोजी हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले. दोन्ही बाजूच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक चर्चेसाठी पाठविले. समितीने एकमताने केलेला अहवाल समंत करण्यात आला. या विधेयकाद्वारे महिला व बालकांच्या विनिर्दिष्ट गुन्ह्यांबाबत अनन्य विशेष न्यायालय स्थापित करण्यात येतील किंवा अस्तित्वात असलेल्या न्यायालयांना विनिर्दिष्ट करता येईल.”

विधेयकाद्वारे विशेष न्यायालय स्थापन होणार आहे. प्रसंगानुसार उपलब्ध न्यायालयांना देखील हा दर्जा देऊन त्यांनाही निर्देशात करणे शक्य होणार आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात गुन्हेगारांना योग्य शिक्षा करणे अत्यंत आवश्यक असल्याने विशेष सरकारी अभिवक्ता बदलण्याची व त्याऐवजी विशेष सरकारी अभिवक्ता नेमण्याची खंड ७ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तर खंड ८ मध्ये विनिर्दिष्ट अपराधांचं अन्वेषन करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष पोलिस पथक गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक, पोलिस अधिकारी यांना अपराधाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर अपराधाचे अन्वेषण विशेष पथकाकडे सोपविण्याचे अधिकार असतील, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!