आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कोगील खुर्द येथे १कोटी २५ लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ : गुणवंतांचाही सत्कार
कोल्हापूर :
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोगील खुर्द येथे १ कोटी २५ लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या विविध विकासकामात जलजीवन मिशन योजना , महादेव मंदिर पायऱ्या करणे, विठ्ठल मंदिर सभागृह विस्तारीकरण, रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते दयानंद संकपाळ यांच्या संयोजनातून घेतलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेतील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी शशिकांत खोत, सरपंच सुरेखा कांबळे,चंद्रकांत गुरव,लता संकपाळ,दिनकर संकपाळ, बाळासाहेब यादव, संजय चव्हाण, तुकाराम उर्फ बाळू शिंगटे ,रामा चव्हाण, भैरवनाथ संकपाळ,शंकर मोरबाळे,प्रविण बिडकर, सुनिल चव्हाण, शिवाजी संकपाळ, विजय गुरव, अरुण मोरे,सागर कांबळे, दत्ता संकपाळ, गजानन यादव, केदारी बिडकर, राम शंकर मोरबाळे,राजू संकपाळ , अभिजीत देठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.