सेंट्रल ह्युमन राईट संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय तोरस्कर यांची निवड
कोपार्डे :
सेंट्रल ह्युमन राईट संघटन, दिल्लीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय रंगराव तोरस्कर (कुडित्रे ता.करवीर) यांची निवड करण्यात आली.सेंट्रल ह्युमन राईट संघटन, दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांच्या आदेशाने व कोअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. तोरस्कर हे विविध समाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्याचबरोबर शिवाजी बाबुराव चव्हाण (साखरी) यांची गगनबाबडा तालुकाध्यक्ष तसेच डॉ. ईश्वरा वापिलकर यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.