करवीर :
वाशी (ता.करवीर) येथील
श्री राम वि.का.स. सेवा संस्थेच्या वतीने धान्य विक्री विभाग सुरू करण्यात आला आहे. या धान्य विभागाचा शुभारंभ आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करणेत आला.
यावेळी श्री राम सहकार समूहाचे नेते, भोगावती कारखान्याचे माजी संचालक बी.ए.पाटील, संस्थेचे जेष्ठ सभासद व संचालक हिंदुराव श्रीपती पाटील, शिवाजीराव कवठेकर , सदाभाऊ डोंगळे, संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील, सचिव मनोज माने, विलासराव ग. पाटील, अनिल कांबळे, शिवाजी पाटील, किरण पाटील, भरत मोहिते, विलास शा. पाटील, रंगराव शेळके, बिरदेव राणगे, विठ्ठल पूजारी, संतोष पाटील, पांडुरंग माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.