शिरोली दुमाला येथील बा.पुं.पाटील विद्यालयात ‘ एक पेड माँ के नाम ‘ अभियान
कोल्हापूर :
शिरोली दुमाला ता. करवीर येथील बाबुराव पुंडलिक पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेच्या व महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ एक पेड माॅ के नाम’ ‘ एक कॅडेट एक पेड’ अभियान राबविण्यात आले.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण बाबुराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियाना अंतर्गत एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थिनींना देशी वृक्ष रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी सचिव डी.एन.पाटील, ग्रामपंचायत सदस्य सूरज नारायण पाटील, मुख्याध्यापक एस.एस दुर्गुळे, एनसीसी केअर टेकर व्ही. एम. वास्कर, क्रीडाशिक्षक एस.बी बनसोडे आदि मान्यवरांच्या हस्ते देशी वृक्ष रोपांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी सहा.शिक्षक आर.ए.पाटील, पी.डी. जाधव, विद्यार्थी उपस्थित होते.