कै. जनाबाई नारायण पाटील यांचा रविवारी १४ वा स्मृतिदिन : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभाग प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती ( रक्तदानासह विविध उपक्रम )
कोल्हापूर:
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी ) यांच्या मातोश्री कै. जनाबाई नारायण पाटील यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी १७ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार आहे.
श्रीमती जनाबाई नारायण पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विश्वास नारायण पाटील फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो. पाचशे हून अधिक बॉटल रक्तसंकलन होते. एकनाथ विद्यालय शिरोली दुमाला, ता.करवीर,जि. कोल्हापूर या ठिकाणी सकाळी आठ वाजता होणार शिबीर होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिरोली दुमाला गावाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी केले.