शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे.. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा एल्गार 

कोल्हापूर : 

शेतकरी, शेती व पर्यावरण उध्वस्त करणारा, ठेकेदारांना पोसणारा प्रस्तावित  शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, यासाठी कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना एल्गार पुकारला.या मार्गाला विरोध करण्यासाठी आज (दि.१८) मंगळवारी  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.  

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केलेल्या आवाहणाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिह्यातील शेतकरी दसरा चौकात जमा होऊ लागले. यावेळी  शक्तिपीठ विरोधात  जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वच मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थिती शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही आग्रही व आक्रमक भूमिका मांडली.

या मोर्चात खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  माजी खासदार राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गिरीश फोंडे समन्वयक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भारत पाटणकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांचेसह मान्यवर,  कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!