शेतकऱ्यांची दमछाक

आधार लिंक करण्याची तारीख वाढवावी

कोल्हापूर :

शेतकरी प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी,
बँक खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दमछाक उडाली आहे. शेतकरी कामे टाकून सेवा सोसायटी आणि बँकेत हेलपाटे मारताना दिसत आहेत. मयत शेतकऱ्याचा वारस एकच असल्यास, दोन पीक कर्ज खात्याचे लाभ मिळणार का ,असे प्रश्न निर्माण झाले आहेत.प्रोत्साहन अनुदानाचे पैसे जमा करण्यासाठी जिल्हा बँकेतील बचत खाते आधारशी लिंक असलेच पाहिजे , असा तगादाही विकास संस्थांनी लावला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून आधार लिंक करण्याची तारीख वाढवावी अशी मागणी होत आहे.

आधार कार्ड कोणत्या बँकेची लिंक आहे हे पहिले पहावे लागते , तसेच आधार लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असल्यास त्याचा ओटीपी त्याच नंबर वर जात आहे, यामुळे आधारशी मोबाईल लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवात होते .
यानंतर बँकेत असणारे जनधन खाते व्यवहार न झाल्यामुळे व जादा रक्कम झाल्यामुळे बंद पडले आहेत, यामुळे पुन्हा नवीन खाते काढण्यासाठी शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत.

बँकेत नवीन खाते काढण्यासाठी आता पॅन कार्ड सक्तीचे केले आहे, यामुळे घरी पॅन कार्ड सापडत नाही, पॅन कार्ड काढण्यासाठी शेतकरी आयकर विभागात हेलपाटे मारत आहेत.
एकाच शेतकऱ्याची दोन खाती आधारशी लिंक होत नाहीत , त्यामुळे इतर बँकेत खाते लिंक आहे , त्यांची अडचण झाली आहे .
मयत शेतकऱ्यांच्या घरी वारसा ने अद्याप कागदपत्रे पूर्ण न केल्याने पुन्हा अडचणीत भर पडली आहे ,यासाठी अपीडेव्हिट करणे आणि बँकेत खाते काढणे अशी कामे करण्यासाठी विधवा महिला हेलपाटे मारताना दिसत आहेत.

वारस शेतकरी खातेदार मयत झाल्यास तसेच वारस एकच असल्यास बँक खाते एकाच आधारशी लिंक होऊ शकते, यामुळे दोन खात्याचा लाभ एका शेतकरी वारस लाभार्थ्याला मिळणार का,
तसेच अनेक वर्ष पीक कर्ज उचलले, मात्र तीन वर्षात एकदाच पीक कर्ज उचलले गेले अशा शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी मागणी होत आहे.

………..
एकनाथ पाटील, यशवंत बँक अध्यक्ष,
काही शेतकऱ्यांचा डिसेंबर महिन्यात ऊस तुटला, मात्र काही कारखान्यांनी साधारण जुलै मध्ये बिल दिले, यामुळे खाती फिटली नाहीत अशा शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो, आणि दरवर्षी सेवा सोसायटी आणि बँकांच्या माध्यमातून पिक कर्ज घेतले जाते मात्र पुन्हा लिंक ची सक्ती कशासाठी.

………
तानाजी मोरे, शेतकरी ,राष्ट्रीयकृत बँकेत ज्या तारखेला पीक कर्ज उचलले तेथून पुढे बारा महिने कालावधी धरतात , अशी खाती थकबाकीत धरू नयेत, यामुळे काही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत, याला शेतकरी जबाबदार की बँका जबाबदार.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!