गोकुळ’ परिवारातर्फे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांचा सत्कार

कोल्‍हापूरःता.१६.

गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी १२ डिसेंबर २०२१ इ.रोजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता व फिनिशर मेडल मिळाले याबद्दल त्‍यांचा सत्कार संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि कार्यकारी संचालक योगेश गोडबोले हे मॅरेथॉन,सायकलिंग,पोहणे,ट्रायथलॉन अश्या अनेक स्पर्धेमध्ये ते भाग घेत असतात. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. श्री पाटील पुढे म्हणाले एखाद्या संस्थेमध्ये कार्य करीत असणारा कर्मचारी वर्ग हा शारिरीक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्याच्या वरील असणारा कामाचा व ताणतणावाचा प्रभाव त्याच्या व्यक्तीमहत्त्वावर व कामकाजावर पडत असतो. योग्य व्यायाम,योगा, सात्विक आहार हे फार महत्वाचे आहे व्यायामामुळे शरीर व मन दोन्ही निरोगी राहतात. व्यायाम आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून सर्वांनी दिवसातून थोडा तरी वेळ काढून व्यायाम करायला हवा. तसेच संघांतर्गत भविष्यात कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा मानस आहे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सत्कारास उत्तर देताना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्‍हणाले कि या मॅरेथॅानचे अंतर २१ किलोमीटर पूर्ण केले आहे व सातारा हिल मॅरेथॉन मध्‍ये सलग पाच वेळा भाग घेतला आहे. हाफ मॅरेथॉनमध्‍ये आजपर्यंत ३१ वेळा भाग घेतला आहे. यशस्‍वीरीत्‍या पूर्ण केले आहे. १०० किमी सायकलिंग चार वेळा यशस्‍वीरित्‍या पूर्ण केले आहे. फुल मॅरेथॉन नाशिक व मुंबई ते पण मी पूर्ण केले आहे. ट्रायथलॉन: १.५ किमी ओपन वॉटर पोहणे, किमी धावणे यांचा समावेश असलेले २०१८ मध्ये कोल्हापूर येथे यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मी अलीकडेच 7 वर्षांपूर्वी माझा क्रीडा क्रियाकलाप सुरू केला आणि माझा विश्वास आहे की कोणताही खेळ सुरू करण्यासाठी वय हा अडथळा नाही, फक्त इच्छाशक्ती, समर्पण, दृढनिश्चय आणि केंद्रित दृष्टीकोन आवश्यक आहे.मला सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिल्याबद्दल माननीय चेअरमन साहेबांचे व सर्व संचालक मंडळाचे विशेष आभार मानले असे मनोगत केले.

      याप्रसंगी याप्रसंगी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित  तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी  पाटील, प्रकाश  पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,शौमिका महाडिक, बोर्ड सेक्रेटरी  एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!