सहकारामुळे जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती : चेअरमन विश्वास पाटील
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
कोल्हापूर (ता. १५):
७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंञ्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या गोकुळ प्रकल्प येथे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करणेत आले.
यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, या अमृतमहोत्सवी ध्वजारोहन आपल्या सर्वाच्या साक्षीने माझ्या हस्ते झाले याचा मला सारत अभिमान आहे. गोकुळच्या या उभारणीत दूध उत्पादकांबरोबर खर श्रेय कुणाला जात असेल तर आपण सर्व संघाचे कर्मचा-यांना जाते.तसेच आपले श्रम कधीही वाया जाणार नाही. गोकुळच्या नाव लौकीकात आपले असलेले येागदान इथून पुढेही असेच राहो. एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये सहकाराच्या व दूध संघाच्या प्रगतीमुळे दूध उत्पादक शेतक-यांना फार मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. तसेच दूध उत्पादक शेतक-यांची आर्थिक उन्नती झाली आहे. याप्रसंगी स्वातंञ्य दिनानिमित्य त्यांनी संघाचे दूध उत्पादक, ग्राहक, वितरक व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
गोकुळ प्रकल्पाबरोबरच ता. पार्क येथील ध्वजारोहन संघाचे संचालक बाबासाहेब चौगले यांचे हस्ते तर गोगवे चिलींग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, गडहिंग्लज चिलींग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, बिद्री चिलींग सेंटर संचालक रणजितसिंह. कृ. पाटील, शिरोळ चिलींग सेंटर संचालक डॉ. सुजित मिणचेकर, तावरेवाडी चिलींग सेंटर संचालक बयाजी शेळके, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना येथे सहा.व्यवस्थापक प्रसाद मुजुमदार यांच्या हस्ते करणेत आले.
याप्रसंगी दूध संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम. पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, संघाचे अधिकारी डी.के.पाटील, कापडीया, स्वामी व कर्मचारी उपस्थित होते.