शक्तिशाली भूसुरुंगाचा आवाजाच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे
राधानगरी :
मानबेट ता.राधानगरी येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे.येथे शक्तिशाली भूसुरुंगाचा वापर होत आहे.
भूसुरुंगाचा आवाजाच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत.
यामुळे शेतकरी नागरिकांच्या चिंतेचे वातावरण आहे.

धामणी मध्यम प्रकल्पाचे काम सहा महिन्यापासून सुरू झाले आहे. प्रकल्पातील सांडव्याचे काम सुरू असलेला डोंगराचा भाग आहे. तो फोडण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून शक्तिशाली भूसूरुंगाचा वापर केला जात असल्याने जोरदार हादरयामुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत.
तसेच झऱ्यातून येणारे चे पाण्याचे स्त्रोत बंद झाले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अशी नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत मालबेटचे सरपंच संभाजी कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवले आहे.
मंगळवारी बैठक…..
प्रकल्प कामातून निर्माण होणाऱ्या प्रश्नासाठी चर्चा करण्यासाठी आज मंगळवारी मानबेट ग्रामपंचायत येथे ग्रामस्थ, पाटबंधारे अधिकारी, ठेकेदार कंपनी यांची संयुक्त चर्चा होणार आहे.