कोल्हापूर :
आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतरावदादा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी राजेश पी. पाटील (सडोलीकर) यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव धुळाप्पा पाटील (कांचनवाडी) यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीर चे सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी काम पाहिले. बँकेच्या स्थापनेपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार सहाय्यक निबंधक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर बाळासाहेब पाटील यांचा सत्कार आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर उपस्थित होते.
यावेळी बँकेचे संस्थापक आमदार पी. एन. पाटील सडोलीकर म्हणाले, बँकेची चार हजार कोटी रुपयांच्यावर वार्षिक उलाढाल आहे. समाजातील विविध घटकासाठी कर्ज योजना राबवल्या असून शेतकरी व लघु उद्योगापासून मोठ्या उद्योग धंद्यापर्यंत सर्वांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला आहे. बँकेची कामगिरी गौरवास्पद आहे.
यावेळी नूतन अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले, बँकेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विविध योजना राबवून तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बी. एच.पाटील संदीप पाटील कुर्डूकर, शिवाजी कवठेकर, सज्जन पाटील, कृष्णात धोत्रे आदिसह बँकेचे सर्व नूतन संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. दिंडे, कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————-
नवनिर्वाचित संचालक मंडळ :
आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर),
राजेश पी. पाटील (सडोलीकर), गणपतराव धुळाप्पा पाटील (कांचनवाडी), रमेश बळीराम कामत (शिरोली दुमाला), एकनाथ पांडुरंग चौगुले (राशिवडे बुद्रुक), तानाजी गणपती पाटील (येळवडे), कृष्णात निवृत्ती चाबूक (सांगरूळ), सुरेश बळवंत पाटील (सोनाळी), सुनील संपतराव आमते(कोथळी), अभिजीत बाबासाहेब पाटील (भुये), जनार्दन शामराव पाटील (नेर्ली), भगवान विश्वास देसाई (भामटे), रणजित जोतीराम शेळके( येवती), नारायण परशराम अंगडी (कोल्हापूर), दीपक हंबीरराव पाटील (पाडळी बुद्रुक),संभाजी कुंडलिक नाईक (गर्जन), सुलोचना पंडितराव तोरस्कर (सांगरूळ), सुनिता किरण मोरे (कणेरीवाडी),गणपती बाळू कांबळे(पाटेकरवाडी),कृष्णात राजाराम कुंभार(खुपिरे).
————=======——–=======———–