जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.रसिका अमर पाटील यांची विद्या मंदिर यादववाडी शाळेस भेट
कोल्हापूर :
यादववाडी ता. करवीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्य,गोरगरिबांच्या,कष्टकऱ्यांचे पाल्य शिकत आहेत, शाळेत लॉकडाऊनच्या, शाळा बंद काळात, केलेला क्रांतीकारी कायापालट सर्व जिल्ह्यातील सर्व वर्गांना दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.रसिका अमर पाटील यांनी केले .शिक्षण सभापती पाटील यांची विद्या मंदिर यादववाडी शाळेस भेट दिली .
आत्तापर्यंत या प्रकल्पाला जिल्ह्यातील व महाराष्ट्रभरातून अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांनी भेटी दिलेल्या आहेत.
यावेळी शिक्षण सभापती सौ.रसिका पाटील म्हणाल्या यादववाडी शाळेच्या “स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम” हा प्रोजेक्ट उल्लेखनीय आहे.केवळ तीन महिन्यांत लोकसहभागातून पूर्ण केलेल्या या प्रकल्पांतर्गत वर्गातील अद्ययावत भौतिक सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी यावेळी केली, तसेच त्यांचे शैक्षणिक उपयोग याची तपशीलवार माहिती देखील घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक, पालक,वर्गशिक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला.वर्षभरात वर्गात व शाळेत घेतलेले विविध उपक्रम व कार्यक्रम यांची माहिती घेतली.मुलांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी वर्षभरात वर्गात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.शाळा बंद कालावधीत विविध उपक्रमाद्वारे वाढवलेली विद्यार्थी गुणवता पाहून शिक्षण सभापती सौ.रसिका पाटील समाधान व्यक्त केले.
आत्तापर्यंत ग्रामपंचायत उंचगाव, पालक व लोकसहभाग मिळून २.५ लक्ष रुपयांचे योगदान वर्गाला मिळाले आहे.याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.आता हा प्रकल्प संपूर्ण शाळेने स्वीकारला आहे.येत्या काही महिन्यात या वर्गासारखे इतर वर्गही तयार करण्याचा मानस येथील ग्रामस्थांचा,पालकांचा व शाळेचा आहे.यानुसार प्रत्यक्ष काम देखील सुरू झाले आहे.या सुरू असलेल्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली .
स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले ,करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य सुनील पोवार, ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन देशमुख ,अमित पाटील, श्रीधर कदम ,स्वीय सहायक संपत नाईक, शाळेचे मुख्याध्यापक ए.के.पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते.