करवीर:
सावर्डे तुम्हाला (ता.करवीर ) येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच भगवान रोटे यांच्या हस्ते तर विद्या मंदिर सावर्डे दुमाला शाळेचे ध्वजारोहण शाळा समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेला विविध स्वरूपात देणगी देणाऱ्या ग्रामस्थांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.माजी सभापती पांडुरंग पाटील, भगवान पाडळकर, उपसरपंच प्रकाश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना तीन एलईडी टीव्ही प्रदान करण्यात आल्या. आदर्श पुरस्कारप्राप्त विद्यार्थी – विद्यार्थिनी व पाढे पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेसाठी शाळा समिती अध्यक्ष युवराज पाटील (दहा हजार रु.), कृषी उद्योजक युवराज कारंडे ( आठ हजार रु.), सन 1996 – 97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून ( स्टील रॅक), रक्तदाता आनंद जाधव ( 25 गरीब विद्यार्थ्यांना दप्तर), शुभम पाडळकर व सिद्धेश पाडळकर ( ग्रीन फलक), त्याचबरोबर वाढदिवस व अन्य प्रसंगाच्या निमित्ताने अनेक युवक व ग्रामस्थांकडून शाळेला देणगी, भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी शाळा समिती उपाध्यक्ष मनोहर पाटील, पो. पा. पंकज गुरव, तंटामुक्त अध्यक्ष बळवंत कारंडे, पी.के.कारंडे, एस. आर.कारंडे, ग्रामसेवक एस. जी वाडकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी वेदांते यांनी तर आभार अध्यापक बी.एल. पाटील यांनी मानले.