स्व.आम.पी.एन.पाटील साहेबांच्या माघारी तुमची आमची जबाबदारी : आम. सतेज पाटील  (गगनबावडा तालुका संपर्क दौऱ्यात राहुल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार, खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार ) 

कोल्हापूर : 

स्व.आमदार पी.एन.पाटील साहेबांचे अचानक निघून जाणे जिल्हा, राज्य पातळीवरील काँग्रेससाठी धक्कादायक होते. लोकसभा निवडणुकीत स्वतः निवडणुकीत जेवढे राबले नाहीत त्याच्या पेक्षा जास्त छत्रपती शाहू महाराजांच्या विजयासाठी राबले. म्हणून करवीर विधानसभा मतदार संघातून ७१ हजारांचे ऐतिहासिक  मताधिक्य  मिळाले. आपली सर्वांची त्याला साथ मिळाली. यापुढे साहेबांच्या नंतर राहुल पाटील यांच्या पाठीशी राहायचे आहे. त्यामुळे स्व.आम.पी.एन.पाटील साहेबांच्या माघारी आता  तुमची आमची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  आम. सतेज पाटील यांनी केले. 

असळज (ता.गगनबावडा) येथे गगनबावडा तालुका संपर्क दौ-यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला.आम. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सतेज पाटील पुढे  म्हणाले,  

पालकमंत्री असताना गगनबावड्यासाठी कोट्यावधीचा निधी दिला. तसेच आमदार म्हणूनही  तालुक्याच्या विकासाला  गती दिली आहे. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात आर्थिक समृध्दी आली.  महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार  येणाऱ्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

यावेळी खासदार शाहू महाराज म्हणाले, लोकसभेत गगनबावड्यातून भरघोस मताधिक्य दिल्याबद्दल येथील जनतेचे आभार. हा तालुका ऐतिहासिक तालुका आहे. खासदारकीच्या माध्यमातून  गगनबावडा तालुक्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. 

यावेळी  शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, कारखान्याचे संचालक बजरंग पाटील, मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

सुरुवातीला स्वागत व शेवटी आभार गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी मानले. कार्यक्रमास गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, अनिल घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष बी. डी. कोटकर, कारखान्याचे संचालक चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, दत्तात्रय पाटणकर, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, गुलाबराव चव्हाण, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, तानाजी लांडगे, वैजयंती पाटील, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश पानारी, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, भगवान पाटील, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, एम. जी. पाटील यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!