मराठा आरक्षण : कसबा बीड येथे साखळी उपोषणास सुरुवात
करवीर :
मराठा आरक्षण लढ्यासाठी ग्रामीण भागातील गावी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. कसबा बीड तालुका करवीर येथे मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय समोरील चौकात आज बुधवारपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. हे साखळी उपोषण अहोरात्र सुरू ठेवण्याचा निर्धार मराठा युवकांनी केला आहे.
तत्पर्वी कसबा बीड येथे म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, मराठ्यांना आरक्षण आलेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी कॅन्डल मार्च करण्यात आला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे आधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
साखळी उपोषणास सकल मराठा समाजाच्या वतीने सुरुवात केली असून ते बेमुदत कायम सुरू राहणार आहे. यां साखळी उपोषणात सकल मराठा समाज, गावातील प्रमुख नेते मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थाचे प्रतिनिधी, युवक, ग्रामस्थ सहभागी होत आहेत.